पं. दिनकर पणशीकर

‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. […]

पं. कृष्ण गुंडोपंत उर्फ के. जी. गिंडे

१९६२ मध्ये ते वल्लभ संगीत विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त झाले. एक उत्तम शिक्षक, विद्वान, गायक व संगीत रचनाकार अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांनी कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीतही ज्ञानदानाचे कार्य केले. […]

नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली. […]

नीलम प्रभू अर्थात करुणा देव

नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता. […]

नीलकंठ खाडिलकर

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या. […]

निरंजन घाटे

प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत. […]

निरंजन उजगरे

निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत. […]

नितीन ढेपे

नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत. […]

नानाजी देशमुख

चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. […]

नाना साहेब पेशवे

शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला. तसेच, लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील खानदेश, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले. […]

1 18 19 20 21 22 80