जी. एन. जोशी

१९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला. […]

जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर

जितेंद्र रघुवीर यांना आत्तापर्यत बालगंधर्व पुरस्कार, कलागौरव पुरस्कार,इंडियन मॅजीक ॲ‍काडमी पुरस्कार, अखिल मराठी नाट्य परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जितेंद्र रघुवीर यांचा युनायटेड नेशन्स, भारत सरकार ऑस्टेलिया व फिजी सरकार यांनी गौरव केला आहे. […]

जितेंद्र जोशी

सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात. […]

जवाहरलाल दर्डा

बाबूजींच्या आयुष्याकडे पाहताना काही गोष्टी विलक्षण वाटतात. यशाने ते कधीही हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने कधीही खचून गेले नाहीत. सत्ता असो किंवा नसो त्याची त्यांना कधीही फिकीर वाटली नाही. सत्तेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे लोकमतचे व्यासपीठ हातात असताना सत्तेची पत्रास काय, असे ते म्हणायचे. […]

जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी

दादा कोंडके, अमोल पालेकर, अशोक सराफ, यशवंत दत्त, अरुण सरनाईक अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी, हिंदीबरोबरच भोजपुरी, तमीळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आदी जवळपास अठरा भाषांतील चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. […]

जयराम कुलकर्णी

लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली. […]

जयंत राळेरासकर

आपण जयंत राळेरासकर यांना अवलिया म्हणू शकतो. जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. शिक्षण बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. २००१ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरी करता करता त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा त्या मुळे १९९२ पासून सोसायटी आॕफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर मुंबई च्या संपर्कात राहिले. वाचन, लेखन, संगीत ऐकणे यातून त्यांनी पाच ते सहा हजार ध्वनिमुद्रिकांचा संग्रह केला. […]

जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली. […]

छत्रपती राजाराम महाराज

राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. […]

चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे

१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. […]

1 22 23 24 25 26 80