वासुदेवशास्त्री खरे
“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या. […]
“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या. […]
“आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला” अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण “शायराना जिंदादिली” पाटणकरांनीच मराठीत आणली. […]
शांता बुद्धिसागर या कथाकार, ललितलेखिका आणि स्वातंत्र्यसैनिक होत्या. Shanta buddhisagar
कवी, कथाकार व अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी झाला. आधुनिक मराठी कविता समृद्ध करणार्या सदानंद रेग्यांनी आजच्या जगाशी सार्वकालिक “मी” चा विसंवाद आणि कालातीत मानवी विकार-वासना यांच्यावर बोट ठेवले. “अक्षरवेल”, […]
इतिहास व तत्वज्ञानाचे अभ्यासक, चरित्रलेखक, कादंबरीकार चिं. गं. भानु यांचा जन्म २४ जुलै १८५६ रोजी झाला. हबर्ट स्पेन्सरचे नीतिशास्त्रविषयक निबंध त्यांनी मराठीत आणले. “नाना व महादजी” ही लेखमालाही ग्रंथरूप झाली.
“उज्वला” या काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. “ऊर्मिला”, “अनुबंध”, “अभ्र”, “पंख-पल्लवी” आदी काव्यसंग्रह तसेच “सायसाखर” हा बालगीतसंग्रह आणि “मृगावर्त” हे खंडकाव्यही त्यांनी लिहिले. “पारख” हा त्यांचा जुन्या-नव्या कवितांचे समीक्षण करणारा लेखसंग्रह असून १८७० ते १९२० या काळातील कवितेचा इतिहासही त्यांनी लिहिला होता. […]
वासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. […]
बाबासाहेब घोरपडे हे मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे लेखक होते. मराठी ग्रंथकारांचे उत्तम ग्रंथ प्रकाशित व्हावेत यासाठी त्यांनी “इचलकरंजीकर ग्रंथमाला” नावाचा प्रकाशन-यत्न सुरु केला. […]
कृष्णराव गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मराठी नाट्यसंगीतावर अमीट ठसा उमटवणारे “मास्टर कृष्णराव”. […]
नीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे हे वादविवादपटू, मराठीतील महत्वाचे ख्रिस्ती धर्मविवेचक, निबंधकार, संस्कृतचे जाणकार आणि वेद-उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions