शंकर बाबाजी पाटील
वळीव, धिंड, भेटीगाठी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबाचा आदी कथासंग्रह तर “टारफुला” ही कादंबरी गाजली. “एक गाव बारा भानगडी”, “पाहुणी” आदी चित्रपटांच्या पटकथाही शंकर बाबाजी पाटील यांच्याच. […]
वळीव, धिंड, भेटीगाठी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबाचा आदी कथासंग्रह तर “टारफुला” ही कादंबरी गाजली. “एक गाव बारा भानगडी”, “पाहुणी” आदी चित्रपटांच्या पटकथाही शंकर बाबाजी पाटील यांच्याच. […]
श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगांचे संपादन त्यांनी केले. तसेच ‘भक्तीच्या वाटा’ हे सुगम पुस्तकही त्यांनी लिहिले. रुद्रार्थदीपिका, परिव्राजकाचार्य आदी त्यांची पुस्तके अभ्यासूंसाठी उपयुक्त ठरली. त्यांच्या अशा […]
‘कुणा आवडतो मोर पिसार्याचा’ या कवितेचे कवी दत्तप्रसन्न नारायण कारखानीस यांचा जन्म १७ ऑगस्ट १९०८ साली झाला. त्यांच्या कवितांचे ‘क्षितिजावर’ व ‘काव्यविलास’ असे दोन संग्रह निघाले. त्यांच्या अनेक कविता मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट झाल्या. […]
दत्तात्रेय व्यंकटेश केतकर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९० रोजी झाला. ‘जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी’ , ‘ जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)’, ‘ज्ञानेश्वर – ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ’ ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. […]
वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालेल्या बर्व्यांनी नक्षलवादी चळवळीसंबंधी “रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता” हे पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी “स्टडफार्म” (कादंबरी) थॅंक्यू मि. ग्लाड, पुत्रकामोष्टी, आकाश पेलताना आदी नाटके आणि “मा निषाद”, “फाशीगेट” हे कथासंग्रह लिहिले. […]
व्यंकटेश बापूजी केतकर हे ज्योर्तिगणितज्ञ व लेखक होते. ज्योतिषगणिताविषयी त्यांनी ग्रहगणित, शास्त्रशुद्ध पंचांगअयनांश निर्णय, नक्षत्रविज्ञान, केतकी परिमल भाष्य आदी पुस्तके लिहिली शिवाय ‘पंचांगोपयोगी कारणग्रंथ’ मराठी व संस्कृतमध्ये लिहिला. व्यंकटेश बापूजी केतकर यांचे ३ ऑगस्ट १९३० […]
शीलावती केतकर (माहेरच्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन) यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ हे मराठीतील महत्वाचे आत्मचरित्र लिहिले. ज्ञानकोशकार केतकरांच्या त्या पत्नी होत्या. २२ नोव्हेंबर १९७९ साली शीलावती केतकर यांचे निधन झाले. ## Sheelavati Ketkar
दत्तात्रय केशव केळकर यांनी सामाजिक, वाङमयीन, शैक्षणिक असे विविधांगी लिखाण केले. ‘काव्यालोचन’, ‘साहित्यविहार’, ‘विचारतरंग’, ‘उद्याची संस्कृती’, ‘वादळी वारे’, ‘संस्कृतिसंगम’, ‘संस्कृति आणि विज्ञान’ या पुस्तकांतून त्यांनी दैववादाकडून विज्ञानवादी भारतीयत्वाकडे जाण्याचा शोध सुरु ठेवला होता. दत्तात्रय केशव […]
पीडीए या नाट्यसंस्थेमुळे ‘भालबा’ ओळखले जात. परंतु ‘तो तो नव्हताच’, ‘असा देव असे भक्त’ आदी पुस्तके, किशोरांसाठी विज्ञानकथा व कादंबरी असे त्यांचे भरपूर लेखनही होते. […]
बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे मराठी कवी, अनुवादक होते. ४ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे निधन झाले. ## Balkrishna Laxman Antarkar
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions