फडके, वि. चिं

शिक्षक या शब्दातील तीन आद्याक्षरांचा खरा अर्थ शिक्षण, क्षमा आणि कर्तव्य असा आहे. त्या आद्याक्षरांचा अर्थ आपल्या प्रत्येक क्षणातून व कृतीतून सार्थ करणारे ठाण्यातील वि. चिं. फडके सर ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके होते. त्यांच्या १९७६ ते १९९६ या वीस वर्षांच्या कालावधीत ‘मटा’मधून त्यांनी केलेली इंग्रजी ग्रंथांची परीक्षणे अनेकांना आठवत असतील. सुमारे ४० वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियातून पंढरीच्या वारीवरील त्यांचा ‘पंढरपूर: काशी ऑफ दी डेक्कन’ या मथळ्याचा आलेला लेख आज अनेकांना स्मरत असेल. ‘फ्रीडम र्फस्ट’ या इंग्रजी त्रैमासिकातून मराठी पुस्तकांची त्यांनी केलेली परीक्षणे इंग्रजी भाषेच्या वाचकांना भावली होती.
[…]

जाधव, विजय

पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात बुडून गेलेले विजय जाधव हे खरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.
[…]

सावरकर, विश्वासराव

स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्‍याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.

‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते.
[…]

पांगे, शुभांगी

मुंबई मराठी साहित्य संघाने आठ नोव्हेंबरला चार वाड्:मयीन पुरस्कार प्रदान केले. त्यातला वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार येशू पाटील यांच्या ‘शब्द पब्लिकेशन्स’ ला; ‘मंगेशराव नारायण कुलकर्णी पुरस्कार’, गंथप्रसारक व अभ्यासक शशिकांत सावंत यांना; ‘केशव भिकाजी ढवळे पुरस्कार’ शुद्धलेखन चळवळ्ये अरुण फडके यांना तर ‘बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार’ ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या आधारस्तंभ शुभांगी पांगे यांना देण्यात आला. पाच हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असा हा पुरस्कार मिळवणार्‍या या चौघांपैकी पहिल्या तिघांची नावे कधी ना कधी कानांवर पडतात. पण शुभांगी पांगे या कायमच पडद्याआड राहिलेल्या वाड्:मयसेवक आहेत. त्यांची मराठी साहित्य आणि व्यवहार यांवरची निष्ठा इतकी प्रखर की, बी ए आणि एम ए केल्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या वाड्:मयसेवेला लवकरच तीन दशके पुरी होतील.
[…]

अण्णाभाऊ साठे

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
[…]

कुडतरकर, गजानन

जे. जे. स्कुलमधील शिल्पकला व मॉडेलिंग ची जी. डी. आर्ट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर शहरात अतिशय चांगल्या संधी व मान उपलब्ध असूनसुध्दा गुंजीससारख्या लहानशा खेड्यात शहरी झगमाटापासून व गजबजाटापासून अगदी दूर आपल्या शिल्पकलेचा कारखाना सुरू करणारे व हिरव्यागर्द निसर्गाच्या व विविध पशुपक्ष्यांच्या सानिध्यात आपल्या शिल्पांना बोलत करणारे हाडाचे कलाकार म्हणजे श्री गजानन कुडतरकर.
[…]

सतिश मोडखळकर

प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो. […]

होर्णेकर, अरूण

कुठल्याही भूमिकेत शिरून तिची मजा लुटणे, ही चांगल्या नटाची खूण त्याच्यात ठसठशीतपणे आहे. म्हणूनच ‘सख्खे शेजारी’सारखा विनोदी रेव्ह्यू असो की ‘कुणी तरी आहे तिथं’ यासारखे रहस्यप्रधान नाटक, अरूणचे त्यातले असणे लक्षणीय ठरते
[…]

म्हसकर, (डॉ.) सुभाष रामकृष्ण

ज्येष्ठ डॉक्टर सुभाष रामकृष्ण म्हसकर यांनी ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ज्ञानाचा ठेवा पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला. म्हसकर यांच्या घराण्यात गेली शंभर वर्षे डॉक्टरी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. एका शतकात आत्तापर्यंतच्या पाच पिढ्यांमध्ये एका घराण्यात ५४ यशस्वी डॉक्टर्स निपजले ही एक विक्रमी घटना म्हणता येईल. […]

1 65 66 67 68 69 80