दलाल, दिनानाथ

चित्रकलेवर ‘दिनानाथ शैली’चा ठसा उमटविणारे दिनानाथ दामोदर दलाल. राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे अतिशय मार्मिकपणे रेखाटता रेखाटता बोजडपणा आणि रसहीनता यापासून आपला कुंचला दूर ठेवून त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठात अमूलाग्र बदल घडवून आणला.
[…]

पै, नाथ ((बॅरिस्टर नाथ पै)

अतिशय विद्वान आणि गोरगरिबांविषयी आत्मीयता असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ले येथे दि. २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. […]

श्रीपाद नारायण पेंडसे (श्री. ना. पेंडसे)

मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणार्‍या श्रीपाद नारायण पेंडसे म्हणजेच श्री. ना. पेंडसे यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ साली झाला. पेंडस्यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. ‘गारंबीचा बापू’, ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं. […]

फाटक, नरहर रघुनाथ (न. र. फाटक)

इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा जन्म १५ एप्रिल १८९३ सालचा. कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. […]

मधू लिमये

अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ. चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये यांचा जन्म पुणे येथे १ मे १९२२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले. १९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. […]

बोडस, गणपतराव

संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. यांचे मूळनाव गणेश गोविंद बोडस. गणपतरावांचा जन्म २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला.
[…]

श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी (पठ्ठे बापूराव)

‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
[…]

शिदे, विठ्ठल रामजी

‘ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि सर्व चळवळींना नैतिक अधिष्ठान असले पाहिजे’ असे उदात्त विचार आणि तपस्वी जीवनाचा पुरस्कार करणारे विठ्ठल रामजी तथा महर्षी अण्णासाहेब शिदे. जमखिडी येथील एका धार्मिक कुटुंबात १८७३ ला अण्णासाहेब शिद्यांचा जन्म झाला.
[…]

बडोदेकर, हिराबाई

ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फत्त* माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. […]

1 77 78 79 80