जयकर, आत्माराम सदाशिव

आत्माराम सदाशिव जयकर यांनी प्राणीशास्त्राच्या विशाल व समृध्द जगतात जे काही नवे व वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचे शोध लावले, त्यांद्वारे त्यांनी सातासमुद्रापार मराठीचा झेंडा रोवण्यात, व सर्वसामान्य मुंबईकरांची व पर्यायाने सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावण्यात लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. लहानपणापासून प्राणीप्रेम हा त्यांच्या स्वभावातील विलोभनीय पैलु होता. जयकरांच्या प्राणीप्रेमाला त्यांच्यामधील कुशाग्र बुध्दीच्या व कमालीच्या चिकीत्सक अशा संशोधकाची उत्तम जोड मिळाल्यामुळेच ते प्राणीशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या व आकलनक्षमतेचा कस लावणार्‍या क्षेत्रात त्यांच्या नावाची अजरामर मोहोर उमटवू शकले. मस्कत मध्ये त्यांनी 30 वर्षे वास्तव्य केले व तिथल्या रमणीय व नेत्रसुखद प्राणीखजिन्याचा मनमुराद आनंद लुटत त्यांनी अनेक नव्या जातींच्या रंगीबेरंगी मास्यांवर, व समुद्राच्या आतमधील असंख्य प्राण्यांवर संशोधन केले व ते प्राणी व्यवस्थितपणे त्यांच्या संग्रही जतन करून ठेविले. अरबी समुद्राच्या किनारी येणार्‍या तर्‍हेतर्‍हेच्या माशांचा पुरेसा साठा जमल्यावर ते सारे मासे त्यांनी ब्रिटनमधील नॅचरल हिस्टरी म्युझियमकडे सुपुर्द केले. प्राणी संशोधन क्षेत्रात अनोखी क्रांती घडवल्याबद्दल जयकरांनी शोधुन काढलेल्यांपैकी बावीस नव्या समुद्री मास्यांना त्यांचे नाव देवून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला गेला.
[…]

मोकाशी, दामोदर आत्माराम

पेण तालुक्यात सर्वत्र अण्णा मोकाशी या नावाने ओळखले जाणारे हे गृहस्थ म्हणजे पेणचे सार्वजनिक काकाच म्हणावयास हरकत नाही.
[…]