ढवळीकर, (प्रा.) (डॉ.) मधुकर केशव

पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
[…]