इनामदार, कौशल

कौशल इनामदार यांनी मराठीच नाहीतर अनेक हिंदी शॉर्ट फिल्मनाही संगीत दिलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत “बालगंधर्व”, “अजिंठा”, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘आग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘अधांतरी’, ‘रास्ता रोको’, ‘इट्स ब्रेकींग न्युज’ आणि ‘हंगामा’ या चित्रपटांना संगीत दिलं आहे. […]

परब, जनार्दन

मराठी रंगभूमी, चित्रपट, तसंच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखविणार्‍यांपैकी एक नाव म्हणजे जनार्दन परब.अनेक हिंदी-मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्‍याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चाय ना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
[…]

परांजपे, राजा

शाळेत असतानाच नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजाभाऊंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. पण चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश अगदी सहजपणे झाला नव्हता. मूकपटांच्या जमान्यात पडद्यावर चित्रपट सुरू असताना साथीला बाहेरून संगीत वाजवले जाई, त्या वेळी अशा मंडळींना गंमत म्हणून साथ करणारे राजाभाऊ हळूहळू चित्रपटसृष्टीकडे वळले. […]

देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण (पुलं)

महाराष्ट्राचे ‘लाडके व्यक्तिमत्त्व’, ‘महाराष्ट्राचे आनंदयात्री’, ‘महाराष्ट्राचे भूषण’, ‘महाराष्ट्राचा अष्टपैलू कलावंत’ असा महाराष्ट्राचा अभिमान असणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
[…]