कुकडे, गोपी
श्री गोपी कुकडे हे जाहिरात जगतातील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व. जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कमर्शिअल आर्टस या विषयात शिक्षण घेतलं. खरंतर ते तिथे आर्किटेक्ट बनण्यासाठी गेले होते. पण त्यांच्यातल्या कलाकारानं त्यांना या विषयाकडे ओढून आणलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्याच सिनेमांची होर्डिंग्स बनवली.
[…]