पालकर, शैलेश
श्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात. […]
श्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात. […]
स्व.मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १४ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल.
[…]
मूळ संख्याशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या सुखात्मे यांनी कृषीउत्पादनाच्या तसेच पोषण आणि आरोग्य या क्षेत्रात लक्षणीय भर घातली. कृषिसंशोधनासाठी, तसेच पिकासंबंधींच्या प्राथमिक माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार्या अनेक संख्याशास्त्रीय पध्दतींचा विकास त्यांनी केला. भारतीय कृषिसंशोधन परिषदेचे संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणून कृषिसंशोधनाचा पाया भक्कम करण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. पिकांच्या संकरित जातींचा विकास करण्यासाठी लागणार्या संशोधनासाठी त्यांनी संख्याशास्त्राचा परिपुर्ण पायाच तयार केला. पुढे जागतिक अन्न आणि कृषिसंस्थेच्या संख्याशास्त्र विभागाचे संचालक म्हणुन काम करत असताना जगातील अन्न धान्य समस्येचा सखोल आभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातूनच जगातील दोन तृतियांश जनता उपासमारीची आणि कुपोषणाची बळी असल्याचा प्रगत, श्रीमंतदेशांचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पोषक आहार आणि रोगराई या दोन घटकांवर आरोग्य अवलंबून असले तरी ग्रामीण भागात आहारापेक्षाही रोगनिर्मूलनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. उत्तर आयुष्यात सुखात्मे यांनी आपले सर्व लक्ष पोषणाचा, विशेषतः भारतातल्या ग्रामीण भागातल्या पोषणाचा आभ्यास करण्यावर केंद्रित केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन करणारे सुखात्मे यांनी देशातील संख्याशास्त्राच्या शिक्षणाला आणि अध्ययनाला चालना देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.
[…]
विष्णु माधव घाटगे हे भारताला हवाई क्षेत्रामधील स्वयंसिध्दतेकडे घेवून जाणारे एक महान वैज्ञानिक, उद्योगपती, व कारखानदार अशा तिहेरी भुमिकेतील तारणहार होते. या तारणहार म्हणण्याला कारणही तसेच आहे, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमान निर्मीतीसारख्या मोठ्या, किचकट, व आधुनिकतेबरोबरच भक्कम आर्थिक पाठबळ लागणार्या उद्योगधंद्यात उतरायला कोणीच धजत नव्हते. तेव्हा या प्रचंड उर्जेच्या, व व्यावसायिक कौशल्यांनी ओतप्रोत भरलेल्या उद्योजकाने कुणाच्याही मदतीशिवाय या पठडीबाहेरच्या, व आव्हानात्मक क्षेत्रात उडी मारली होती. घाटगे यांनी त्यांच्या स्वप्नवत कारकीर्दीमध्ये अनेक प्रकारची विमाने बनविली व विकलीसुध्दा. आपल्या डोक्यातही येणार नाही अशा कितीतरी दैनंदिन गोष्टी विमानाच्या साहाय्याने सुसह्य व गतिमान कशा करता येवू शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले होते. जसे पिकांवर औषधे व किटकनाशके फवारण्यासाठी कृषक हे चालवण्यास अतिशय सहज सोपे, व खिशाला परवडणारे विमान त्यांनी सामान्य शेतकर्यांसाठी बनविले होते. घाटगे यांनी ज्याप्रमाणे बाहेरच्या देशांना भारत कशा प्रकारे राखेतून सुरूवात करून आपल्या कर्तुत्वाची सुंदर व कल्पक रांगोळी निर्माण करू शकतो हे दाखवून दिले होते, त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य उद्योजक होऊ पाहणार्या नव-तरूणांना प्रेरणा व आत्मविश्वासाचे तेज दिले होते. गुलाम गिरीची पुटं कधीच झाडली गेली होती व एक नव तंत्रज्ञानाचं, व विज्ञानाचं लख्ख आभाळ भारताला साद घालत होतं, या सादेला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो या स्वप्नाळू, परंतु बेहद निश्चयी मराठमोळ्या तरूणाने.
[…]
आत्माराम सदाशिव जयकर यांनी प्राणीशास्त्राच्या विशाल व समृध्द जगतात जे काही नवे व वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचे शोध लावले, त्यांद्वारे त्यांनी सातासमुद्रापार मराठीचा झेंडा रोवण्यात, व सर्वसामान्य मुंबईकरांची व पर्यायाने सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावण्यात लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. लहानपणापासून प्राणीप्रेम हा त्यांच्या स्वभावातील विलोभनीय पैलु होता. जयकरांच्या प्राणीप्रेमाला त्यांच्यामधील कुशाग्र बुध्दीच्या व कमालीच्या चिकीत्सक अशा संशोधकाची उत्तम जोड मिळाल्यामुळेच ते प्राणीशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या व आकलनक्षमतेचा कस लावणार्या क्षेत्रात त्यांच्या नावाची अजरामर मोहोर उमटवू शकले. मस्कत मध्ये त्यांनी 30 वर्षे वास्तव्य केले व तिथल्या रमणीय व नेत्रसुखद प्राणीखजिन्याचा मनमुराद आनंद लुटत त्यांनी अनेक नव्या जातींच्या रंगीबेरंगी मास्यांवर, व समुद्राच्या आतमधील असंख्य प्राण्यांवर संशोधन केले व ते प्राणी व्यवस्थितपणे त्यांच्या संग्रही जतन करून ठेविले. अरबी समुद्राच्या किनारी येणार्या तर्हेतर्हेच्या माशांचा पुरेसा साठा जमल्यावर ते सारे मासे त्यांनी ब्रिटनमधील नॅचरल हिस्टरी म्युझियमकडे सुपुर्द केले. प्राणी संशोधन क्षेत्रात अनोखी क्रांती घडवल्याबद्दल जयकरांनी शोधुन काढलेल्यांपैकी बावीस नव्या समुद्री मास्यांना त्यांचे नाव देवून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला गेला.
[…]
असं म्हणतात की देवाने माणसाला काही विशीष्ठ विषयांमध्ये गती दिलेली आहे, व काहींमध्ये अधोगती. परंतु काही हिरे असे असतात, की जीवनातील अनेक क्षेत्रे व नाण्याच्या दोन्ही बाजू उत्तमपणे हाताळण्याची कला त्यांना उत्तम अवगत असते. एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे किंवा एकाच क्षेत्रात पुर्णपणे बुडून, त्यात भव्य दिव्य असे काहीतरी मिळवावे असली तत्वे त्यांना कधीच रूचत नाहीत. जीवनाच्या विवीधांगी विचारधारांमधे, मतप्रवाहांमधे, किंवा कलाकौशल्यांमधे सतत डुबकी मारण्याचा त्यांचा स्वभावच असतो व त्यांच्यासमोर पसरलेल्या विभीन्न व्यावसायिक, तांत्रिक, माहिती, संशोधन, कला, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांच्या जाळ्यामध्ये ते तितक्याच तन्मयतेने व आत्मीयतेने काम करीत असतात. अशाच एका अत्यंत चळवळ्या व विज्ञानाच्या विवीध वाटा कोळून प्यायलेल्या संशोधकाचे नाव म्हणजे दामोदर कोसांबी.
[…]
डॉक्टर विट्ठल नागेश शिरोडकर यांचे महिलांसाठी असलेले अतुल्य योगदान पाहिले की मन भरून येते. मातृत्व हा प्रत्येक मातेसाठी व तिच्या कुटुंबियांसाठी सर्वात आनंदाचा, समाधानाचा, व आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखा क्षण असतो. शेवंतीच्या फुलांसारखी सुगंधी दरवळ आणणारा, व आनंदाच्या व हास्याच्या कारंज्यांनी घर भारून टाकणार्या या क्षणाला कोणाची नजर लागू नये यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य व कारकीर्द पणाला लावली होती. सतत होणारे गर्भपात या विषयावरील त्यांचे यशस्वी संशोधन, म्हणजे प्रत्येक गृहिणीसाठी तिच्या आईपणाची शाश्वती देणारे अमृतच ठरले. त्याकाळी शारिरीक गुंतागंतींमुळे गर्भपात होण्याचे प्रमाण फार मोठे व सामान्य होते.
[…]
प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!
गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
[…]
उजव्या कोप-यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.
वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले.
[…]
समजायला लागल्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीसाठी रात्रभर समुदावर राहायचे व सकाळी शाळेला हजेरीही लावायची, असे खडतर आयुष्य जगणार्या उरणच्या संतोष पाटील या जलतरणपटूने नुकतीच जिब्राल्टरची खाडी पोहून पार करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा संतोष हा पहिलाच ‘नौसैनिक’.
उरणच्या केगाव-दांडा या ग्रामीण भागात राहणार्या संतोषच्या पोहण्याच्या आवडीला एका ध्येयाचे रूप मिळाले ते सेंट मेरी आणि ‘नेटिव्ह स्कूल ऑफ उरण’ या शाळांमध्ये. शाळेत संतोषने जिल्हा, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत आपले भन्नाट वेगात पोहण्याचे कौशल्य दाखवले आणि वयाच्या १६व्या वर्षी धरमतर ते मुंबई हे अंतर ९ तास १६ मिनिटांत पार केले.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions