देशपांडे, प्रवीण केशव

गेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण देशपांडे छाछायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत आहेत.
[…]

बांदेकर, प्रवीण

गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक-राजकीय बदलांचा आडवा-उभा वेध घेणारी प्रवीण बांदेकर यांची ‘चाळेगत’ ही कादंबरी कोकणातील सद्यस्थितीची हुबेहूब सावली ठरली आहे. आधी ‘विभावरी पाटील’ आणि आता सोलापूरचा मानाचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार मिळवून बांदेकरांच्या या कादंबरीने समकालातील आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. अर्थात हे वेगळेपण केवळ कादंबरीच्या विषयात नाही, तिच्या मांडणीतही आहे. लेखकाने स्वत:शीच बोलावं, किंवा दशावतारातील शंकासुराने कथा सांगावी, असा कादंबरीचा साचा आहे आणि हा साचा कोकणातल्या मातीतूनच त्यांच्यात रुजलेला आहे. कारण बांदा-सावंतवाडीचं तळकोकण हीच बांदेकरांची जन्मभूमी, कर्मभूमीही आणि स्वप्नभूमीही. त्यामुळेच या स्वप्नभूमीत गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांनी (अर्थात वाईट बदलांनी) त्यांचं मन हळहळलं नसतं, तरच नवल होतं! ‘चाळेगत’ ही प्रवीण बांदेकर यांची पहिलीच कादंबरी!
[…]