मनोहर, (डॉ.) प्रियदर्शन

डॉक्टर प्रियदर्शन मनोहर हे एक प्रतिभावंत मराठी लेखक आहेत. त्यांच वास्तव्य हे परदेशात असून सध्या ते मराठी मंडळ या पिटसबर्ग या संस्थेसाठी लेखक म्हणुन काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विपुल लेखनाला अमाप प्रसिध्दी मिळाली असून त्यांच्याभोवती गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिध्दीच एक वलयच निर्माण झालय. सातासमुद्रापल्याड, मराठीचा कलात्मक तसेच वैचारिक प्रसार व प्रचार करणारा हा गुणी कलाकार, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगळ्या व स्वतंत्र लेखनशैलीची रसिकांवर छाप पाडण्यात विलक्षण यशस्वी ठरला आहे लघुकथा हा जरी प्रियदर्शनांचा आवडता प्रांत असला तरी सांगितीक नाटकांच्या लेखना व सादरीकरणापासून ते विनोदी, मनोरंजन कथा लिहीण्यापर्यन्त सार्‍याच गोष्टी त्यांना उत्तम जमतात. संसार व्हर्जन 2 हा त्यांनी सादर केलेला अतिशय रंजक असा सांगितीक एकपात्री प्रयोग चांगलाच गाजला. त्यांनी लिहीलेल बहुतांशी साहित्य हे मराठी मंडळातर्फेच प्रकाशित केल जात. त्यांच्यामधील अष्टपैलु, काहीसा भावनाप्रधान पण तेवढाच मिश्कील असा लेखक वाचकांमध्ये चांगलाच रूजला असून त्यांच्या यशाच हेच तर गमक आहे.
[…]