वागळे, निखिल

निखील वागळे हे आय. बी. एन. लोकमत या मराठीमधल्या सर्वात जास्त चालणार्‍या वृत्तवाहिनीचे तेजस्वी व बाणेदार पत्रकार असून राजकारणी लोकांच्या ते फारसे पचनी पडलेले नसले तरी सामान्य जनतेच्या मनात मानाचे स्थान त्यांनी केव्हाच पटकावलेले आहे. आपल्या स्प्ष्टवक्तेपणामुळे ते वादांच्या भोवर्‍यांमध्ये अनेकदा अडकले असले, तरी त्यांची परखड मते सुज्ञ लोकांना स्पर्शुन जाणारी असल्यामुळे, महाराष्ट्रातील लोकप्रिय व सर्वपरिचीत पत्रकारांमध्ये त्यांची गणती केली जाते.
[…]