अभिनेते उदय टिकेकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९६५ रोजी झाला.
मराठी-हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर प्रभावी करणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे उदय टिकेकर. अभिनयात कारकीर्द घडविणाऱ्या उदय टिकेकर यांना आई-वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला होता. उदय टिकेकर यांचे वडील बाळासाहेब टिकेकर हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक तर सुमती टिकेकर ह्या जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत. बहीण उषा देशपांडे ह्या पं. फिरोज दस्तूर यांच्या शिष्या. मात्र घराण्यात गायन असूनही उदय टिकेकर यांनी अभिनयाची वाट जोपासली.
अभिनेता म्हणून ‘धाकटी सून’ हा उदय टिकेकर यांचा पहिला चित्रपट होय. पुढे ‘आव्हान’ मालिकेतील खलनायकी भूमिकेमुळे ते घराघरांमध्ये पोचले. ‘सातच्या आत घरात’, ‘भय’, ‘दुनियादारी’, ‘खो खो’, ‘सतरंगी रे’, ‘अर्जुन’, ‘गुलदस्ता’, ‘साडे माडे तीन’, ‘इश्य’, ‘शुभमंगल सावधान’, ‘फेकाफेकी’, ‘इश्य’, ‘लई भारी’ हे त्यांचे काही महत्त्वाचे मराठी चित्रपट. उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.
Leave a Reply