१) श्री. उमेश इनामदार यांचा जन्म १९६० साली मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील पोद्दार हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले. १९८० साली त्यांनी बी.कॉम. ची पदवी अॅडव्हान्स अकौंटिंग व ऑडिटिंग हे विषय घेऊन प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केली. १९८२ साली त्यांनी एम.कॉम. ची पदवी अ ॅडव्हान्स अकौंटिंग व कंपनी लॉ अॅण्ड प्रॅक्टिस हे विषय घेऊन प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केली. १९८८ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकर्समधून द्वितीय श्रेणीमध्ये सी.ए.आय.बी. पूर्ण केले. १९९५ साली पुणे विद्यापीठातून त्यांनी डिप्लोमा इन् कॉम्प्युटर मॅनेजमेंट प्रथम श्रेणीत पूर्ण केला. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बॅंक मॅनेजमेंट (एन.आय.बी.एम.) या नामांकित संस्थेतून त्यांनी अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेन्ट अॅन्ड रिस्क मॅनेजमेन्ट या नावीन्यपूर्ण विषयाचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
२) १९७९ साली दि सारस्वत को-ऑप. बॅंक लि. या भारतातील सहकारी क्षेत्रातील प्रथम क्रमांकाच्या बॅंकेत त्यांनी आपल्या बॅंकिंग कारकिर्दीची सुरुवात केली. वीस वर्षांच्या सेवा कालावधीत सीनिअर मॅनेजर या पदापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी सारस्वत बॅंक सोडली. या वीस वर्षांच्या काळात त्यांनी सारस्वत बॅंकेच्या मुंबई व पुणे येथील शाखांतून शाखाधिकारी म्हणून कामकाज सांभाळले तसेच बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील कर्ज विभाग, हिशेब विभाग, निधी व्यवस्थापन विभाग अशा अनेक विभागांतूनही कामकाज सांभाळले.
३) ऑक्टोबर १९९९ मध्ये पुणे येथे स्थायिक होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी श्री. सदगुरु जंगली महाराज सहकारी बॅंक लि. चिंचवड येथे सरव्यवस्थापक म्हणून कार्यभार स्वीकारला. दिनांक ३/१०/२००१ रोजी त्यांनी सदर सेवेचा राजीनामा दिला. या दोन वर्षांच्या कालावधीत बॅंकेचा एकूण व्यवसाय रु २४० कोटींवरुन रु ४१० कोटींपर्यंत वाढला. तसेच भागभांडवल रु. २ कोटींपासून रु. ४ कोटींपर्यंत तर निधी रु. २ कोटींपासून रु. १३.५० कोटींपर्यंत वाढले. या कामगिरीचे कौतुक भारतीय रिझर्व्ह बॅंक व सहकार खाते, महाराष्ट्र राज्य यांच्या तपासणी अहवालातहीनोंदले गेले आहे.
४) दि. ४/१०/२००१ पासून ते एका खाजगी कंपनीत संचालक म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.
५) आय.एम.सी.डी., सहकारवर्धिनी, सहकारभारती, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई व अनेक जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनमध्ये त्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली आहेत. अर्थमंथन, दैनिक सकाळ, तरुण-भारत वगैरे वृत्तपत्रांतून त्यांचे अर्थविषयक विविध लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
Leave a Reply