ठाणे शहर म्हणजे संगीतरत्नांची खाणच आहे. नव्या पिढीच्या गायिका म्हणजे वरदा गोडबोले ! संस्कृत विषयात सुवर्णपदकासह पदवी प्राप्त करुन मुंबई विद्यापीठातून संगीत विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
गेली २५ वर्षं ठाण्याच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात आपली कला सादर करणार्या वरदा ताईंनी शालेय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. पुढे भारतात विविध ठिकाणी संगीत महोत्सवात कार्यक्रम सादर केले. विशेष म्हणजे संस्कृत आणि गायन यांची सांगड घालणारे कार्यक्रम त्यांनी सादर केले.
वरदा गोडबोले यांना सूरमणी पुरस्कार, डागर पुरस्कार, पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Leave a Reply