आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्यलढ्यापासून करणार्या वसंत दादांनी तब्बल चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. ग्रामीण विकासाला केंद्रभूत मानून वसंतदादा आजीवन कार्यरत राहिले. दादांचा लोकसंग्रह मोठा होता. विधायक काम करण्याचा दांडगा अनुभव असल्याने त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात मोठे कार्य उभे केले. विनाअनुदान तत्त्वावर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी देण्याचा त्यांचा निर्णय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडून देणारा ठरला. राज्याच्या ग्रामीण भागात कृषी औद्योगिक विकासाचा भक्कम पाया त्यांनी घातला. सहकारी चळवळीच्या माध्यमातून राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यात वसंतदादांची भूमिका महत्वाची राहिली आहे. त्यांच्याच कारकिर्दीत फलोद्यान विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. कांद्याला आधारभूत दर, ग्रामीण रस्तेविकास कार्यक्रम, शेतकरी सहकारी कारखान्यांची उभारणी, सहकारी संस्था, पतपेढ्या, बाजार समित्यांची स्थापना, आरोग्य केंद्राच्या स्थापनेला वेग इत्यादी भरीव स्वरुपाचे काम वसंतदादांच्या कारकिर्दीत घडून आले. महाराष्ट्राच्या प्रगतीची वाट दादांच्या काळात अधिक रुंदावली. राज्यात वाढलेली सहकारी चळवळ, शैक्षणिक संस्था व उद्योगधंदे ही वसंतदादांची स्मारके आजही सर्वांना प्रेरणादायी आहेत.
## Vasantdada Patil
वसंतदादा पाटील यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
जेष्ठ नेते वसंतदादा पाटील (13-Nov-2021)
सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते वसंतदादा पाटील (1-Mar-2022)
Leave a Reply