पंडीत, वेधस

Vedhas Pandit

वेधस पंडित

वेधस पंडित म्हणजे मराठी माणसाच्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाला अधोरेखित करणारा, व भारताचा झेंडा अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये डौलाने फडकविणारा एक कर्तुत्ववान तरूण आहे. बालमोहन विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वेधसला लहान्पणापासूनच प्रत्येक गोष्टीला स्वतःचा वेगळा स्पर्श देण्याची सवय होती. ” रामनारायण रूईया ” , “सी. ओ. इ. पी”  व “आय. आय. टी.” अशा मुंबई मधल्या व पुण्यामधल्या नामांकित व्यक्तिस्वातंत्र्याला चालना देणार्‍या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यातील, सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या तंत्रज्ञाला चांगला व रेखीव आकार मिळाला. पारंपारिकतेच्या बेड्या मान्य नसल्यामुळे तो नवे, व स्वछंदी प्रयोग करतच राहिला.

तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात कौशल्यापेक्षाही, दीर्घकाळ टिकणारी आवड जास्त महत्वाची ठरते व त्याला तंत्रज्ञान या विषयाबद्दल मनात प्रचंड जिव्हाळा व प्रेम होते. सध्या कनेक्शन वन रिसर्च लॅब मध्ये तो पदवीधर संशोधक साहाय्यकाचे काम करीत आहे. अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये त्याने श्रेणीधर म्हणून ‘डिजीटल सिग्नल प्रोसेसिंग’ या क्षेत्रात असताना, त्याच्या कल्पकपणाचा व कुशाग्र बुध्दीचा प्रत्यय सर्वांना आलेला आहे. डिसेंबर २०१० मध्ये वेधसने, ‘मिक्सड सिग्नल अँड इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन’ हा विशेष विषय निवडून त्याची मास्टर्स पदवी अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मधून प्राप्त केली. तिथे त्याला पाचही परीक्षांसाठी पदवीधर संशोधन साहाय्यकाचे मानाचे पद देण्यात आले. वेधसने त्याच्या पदवीपुर्व काळामध्ये मुंबईच्या आय. आय. टी. या जगप्रसिध्द संस्थेमध्ये लॅब एन्टर्न, तसेच “सी. ओ. ई. पी.” या आशियामधील दुसर्‍या सर्वात जुन्या, व भारतातील पहिल्या पंधरा नामांकित कॉलेजेसच्या यादीत मोडणार्‍या कॉलेजमध्ये प्रकल्प विद्यार्थी या भुमिका उत्तमपणे वठवून अनुभवांचे विविध रंगी पाचु आधीच वेचून ठेविले होते. या संस्थांमध्ये जीवापाड मेहेनत, व सतत मेंदु व डोळे उघडे ठेवून काम केल्यामुळे त्याला आजच्या तंत्रज्ञान विश्वातील चमत्कार व त्रुटी यांबद्दलची सांगोपांग माहिती, प्रात्यक्षिकांसोबत मिळाली. पुण्यामध्ये असताना त्याने मायक्रोकंट्रोलर वर आधारित लादी पुसणार्‍या रॉबोटची रचना यशस्वीरित्या साकारून, त्याच्यातील प्रतिभावान तंत्रज्ञाची झलक सर्वांना दाखवून दिली. तसेच डी. एस. पी चीपच्या साहाय्याने ‘अ‍ॅक्झियल फ्लक्स बी. एल. डी. सी. मोटार’, नियंत्रित करण्याची किमया वेधसने मुंबईमध्ये असताना करून दाखविली होती. तंत्रज्ञानासारख्या किचकट क्षेत्रात झपाटल्यागत काम करीत असतानासुध्दा, स्वतःमधील सच्चा कलावंत त्याने झाडांच्या मुळांप्रमाणे चिकाटी दाखवून जपला आहे. त्याने त्याच्या संपुर्ण शैक्षणिक कारकीर्दीमध्ये मोठ्या हौशेने लिहिलेली व चाली लावलेली कित्येक गाणी आजही त्याच्या संग्रही जतन आहेत.

वेधस पंडितचा ब्लॉग :  http://vedhaspandit.blogspot.in/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*