पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपलं घर या संस्थेचे संचालक श्री विजय गजानन फळणीकर…
नोकरी : नागपुर दूरदर्शन केंद्रावर असिस्टंट आर्ट डायरेक्टर (१९८३ ते १९८५)
नोकरी : बालचित्रवाणी पुणे येथे फ्लोअर मॅनेजर (१९८६ ते २००५)
८ सिरिअल्सचे दूरदर्शनसाठी आर्ट डायरेक्शन, पुणे आकाशवाणीसाठी प्रायोजित कार्यक्रमांची निर्मिती.
२००१ मध्ये वैभव या एकुलत्या एक मुलाचे १६ व्या वर्षी निधन झाले. त्याच साली “लेट वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन” या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. २००२ मध्ये वैभवच्या विमा पॉलिसीचे रुपये २,५८०००/- आले त्यातुन एक अॅम्ब्युलन्स घेतली आणि २४ तास ना नफा ना तोटा या तत्वावर सेवा द्यायला सुरुवात केली. आजही ती सुरु आहे. २००२ मध्ये आपलं घर नावाने पुणे ( वारजे – माळवाडी ) येथे १४ मुलांना घेऊन अनातालय (ऑर्फनेज) सुरु केले आज वारजे आणि डोणजे मिळुन ४८ मुले मुली आहेत. तसेच डोंजे (सिंहगड पायथा) पुणे येथे निर्धार आजी आजोबांसाठी ओल्डएज होम २००८ साली सुरु केले. येथील वरिष्ठ नागरिकांकडून कुठलेही शुल्क अथवा डिपॉझिट घेतले जात नाही. तसेच नुकतेच याच परिसरात ग्रामीण भागातील गरीब मुलांसाठी “उद्योग प्रशिक्षण केंद्र” सुरु केले असुन येथे १४ प्रकारचे कोर्सेस विनामूल्य शिकवले जातात. एकुण ४८ मुले, १० आजी-आजोबा, अणि १४ लोकांचा निवासी स्टाफ असा एकुण ७२ जणांचा संसार सरकारची कुठलीही मदत न घेता चालला आहे.
पुरस्कार : मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार, पुण्य गौरव पुरस्कार, ब्रदरहुड फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, भरत नाट्य मंदिरचा उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार, ओमकार न्यासचा पथदर्शी पुरस्कार, भारतीय विद्या भवनचा डी.आर. नगरकर स्मृति पुरस्कार, मनशक्ती केंद्र लोणावळा चा लोक कल्याण पुरस्कार, श्री. गुरुदत्त सेवा ट्रस्टचा समाजभूषण पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन चा सेरा अॅवार्ड
Great