११ जून १९४२ रोजी कारवार येथे जन्मलेल्या विलास सारंग यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. इंग्रजी विषयात एम्.ए, तसेच डब्ल्यू. एच्. ऑडन या इंग्रजी कवीवरील प्रबंधलेखनासाठी मुंबई विद्यापीठाची १९६९ साली पीएच्. डी. आणि अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात “तौलनिक साहित्याभ्यास“ या विषयात त्यांनी पीएच्. डी. मिळविली आहे.
आधुनिक, प्रयोगशील व अस्तित्ववादी धारणेचे लेखक अशी त्यांची ख्याती आहे.मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत स्वतंत्र लेखन केले आहे. कथा, कादंबरी, काव्य व समीक्षा या वाङ्मयप्रकारांत नवनिर्मिती घडवून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. १९७५ मध्ये “सोलेदाद” हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्घ झाला. त्यानंतर “आतंक” हा कथासंग्रह; “एन्कीच्या राज्यात”, “रुद्र”, “अमर्याद आहे बुद्घ” या कादंयार्या; “कविता: १९६९–१९८४” हा काव्यसंग्रह , तसेच “सिसिफस आणि बेलाक्वा”, “मराठी नवकादंबरी”, “अक्षरांचा श्रम केला”, “सर्जनशोध आणि लिहिता लेखक” ही समीक्षालेखांची पुस्तके हे त्यांचे महत्त्वाचे वाङ्मयकृतीं. १९७८ रोजी त्यांचा “अ काइंड ऑफ सायलन्स” हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्घ झाला आहे. त्यांच्या कथांचे इंग्रजी व फ्रेंच भाषांतील अनुवाद विविध पाश्चात्त्य नियतकालिकांतून प्रसिद्घ झाले आहेत. “लँनादो” या लेखकाने फ्रेंच भाषेत केलेल्या त्यांच्या कथांच्या अनुवादाचा “ल तेररीस्त ए ओत्र रेसी ”हा संग्रह १९८८ साली प्रकाशित केला, तसेच त्यांच्या इंग्रजीतील अनुवादित कथांचा संग्रह “फेअर ट्री ऑफ द व्हॉइड” या शीर्षकाने १९९० मध्ये प्रसिद्घ झाला आहे. २००५ साली त्यांची “द डायनोसॉरशिप” ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्घ झाली. या पुस्तकांनी सारंगांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली आहे .
त्यानंतरच्या काळात काफ्का, सार्त्र, काम्यू व बेकेट या यूरोपीय अस्तित्ववादी लेखकांच्या चा परिचय करून देणारे सिसिफस आणि बेलाक्वा हे समीक्षेचे पुस्तक सारंग यांनी लिहिले.मराठीतल्या “कोसला”, “अजगर”, “सात सक्कं त्रेचाळीस” व “हॅट घालणारी बाई” या कादंबर्यांचे विश्लेषण सारंगांनी मराठी नवकादंबरी या समीक्षापुस्तिकेत केले आहे. त्यांचे “मॅनहोलमधला माणूस: मराठी वाङ्मय”, “समाज व जातिवास्तव” हे पुस्तक मुख्यतः साहित्यसमीक्षापर असले, तरी त्या अनुषंगाने घेतलेला समाजशास्त्रीय शोधही महत्त्वाचा आहे.
Leave a Reply