विष्णु भिकाजी कोलते

महानुभावीय साहित्याची गूढ लिपी उकलून, महानुभावीय साहित्याचं संशोधन वि. भिद्य कोलते यांनी केलं.
या साहित्याचा अभ्यास करुन त्यावरुन अनेक ग्रंथ सिध्द केले आहेत. `भास्करभ बोरीकर-चरित्र व काव्यविवेचन`, महानुभाव तत्वज्ञान` , `महानुभावांचा आचारधर्म` , श्रीचक्रधरचरित्र`, `महानुभाव संशोधन ` हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. `मूर्तीप्रकाश` , `दामोदर पंडिताचे वछाहरण`, नरेंदाचे रुक्मिणीस्वयंवर` , भास्कर भ बोरीकर` यांची उध्दव गीता` आणि शिशुपाल वध` , म्हाईंभटाचे गोविंदप्रभूचरित्र`, मुनिव्यासांची स्थानपोथी`, रवळो व्यासांचे सहयादिवर्णन` या सर्व ग्रंथांचं साक्षेपी संपादन पाठचिकित्सा पध्दतीनं कोलते यांनी केलं आहे.

याबरोबरच , `चक्रधर आणि ज्ञानेश्वर`, महानुभावांचे अवैदिकत्व` हे स्फुट लेखन प्रसिध्द आहे. साहित्यसंचार` आणि प्राचीन मराठी साहित्य संशोधन हे त्यांचे ग्रंथ आहेत. काही शिलालेख आणि ताम्रपटांचं वाचनही केलेलं आहे.

(1908 – 1995)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*