(जन्म १९२५ मृत्यू २००६)
भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आणि बालविज्ञान चळवळीचे प्रणेते. एम.एस्सी., पीएच.डी. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नागपूर व मुंबई येथे भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीत त्यांनी सहसंचालक म्हणून काम केले. त्याचप्रमाणे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समितीचे सचिव म्हणूनही काम केले. भौतिकशास्त्रावर शंभरपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले, तसेच पन्नास
विद्यार्थ्यांना पीएच.डी.करिता मार्गदर्शनही केले. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी. सौरऊर्जा वापराकरिता खास प्रयत्न केले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. मराठी विज्ञान परिषदेच्या चौदाव्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी म्हणून त्यांनी पुण्यात ‘विज्ञान संशोधिका’ एक्स्प्लोरेटरी) उभी केली. तसेच, त्यांनी महाराष्ट्रभर बालविज्ञान चळवळ सुरू केली. यांच्या प्रयत्नाने २००० सालापासून इंडियन सायन्स काँग्रेसला जोडून चिल्ड्रेन सायन्स काँग्रेस भरवण्यास सुरुवात झाली.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply