वामन पंडित हा रामदासाचा समकालीन असून पंडीत संप्रदायाचा प्रातिनिधिक कवी होय. त्याचा कालखंड इ.स. १६३६ ते १६९५ असा मानला जातो. तो संस्कृत पंडित होता. प्रारंभी त्याने संस्कृत भाषेत रचना केली होती, परंतु पुढे रामदासस्वामींच्या सांगण्यावरुन त्याने मराठीत ग्रंथरचना केली. त्याच्या ग्रंथांमध्ये निगमसार, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थदीपिका, कर्मतत्व इत्यादींचा समावेश होतो.
तथापि, वामन पंडित प्रसिध्द आहे तो त्यांच्या आख्यान कवितांमुळे राम व कृष्ण यांच्या जीवनावरील महत्वाच्या प्रसंगांवर ही आख्याने आहेत. वामन पंडिताची आख्याने विविध श्लोकवृत्तात्मक असून प्रत्येक आख्यानाच्या प्रारंभी मंगलाचरण आहे आणि त्या मंगलाचरणातच त्या आख्यानाचे सारही सांगितले आहे. विविधता, विदग्धता आणि विपुलता यांनी त्याचे काव्य नटलेले आहे. यमक आणि प्रसाचा हव्यास हे त्याच्या शैलीचे वैशिष्टय सांगता येईल. त्याच्या रचनेतील यमकाच्या अतिरेकामुळे त्यास खमक्या वामन असे म्हटले जाते.
Leave a Reply