साहित्य :- दोन वाट्या टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा कीस, त्यात मावेल तेवढे बेसन, पाव वाटी तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा सालासह देशी तीळ, एक चहाचा चमचा हातावर चोळलेला ओवा, चवीनुसार मीठ व तिखट, तळण्यासाठी दोन वाट्या तेल.
कृती :- प्रथम एका बाऊलमध्ये टरबुजाचा कीस घ्यावा. त्यात तिखट, मीठ, तीळ व ओवा घालावा. त्यात तांदळाची पिठी घालावी. हे मिश्रण थेडे दाट होण्यासाठी त्यात मावेल तेवढे बेसन घालावे. कढईत मंद आंचेवर तेल गरम करावे. त्यात वरील मिश्रणाची छोटी छोटी बोंडे तयार करून तळावीत. गरम खायला द्यावीत.
टीप वरील मिश्रण थोडी जास्त पिठी आणि बेसन घालून घट्टच परतावे. त्याचे वडे हातावर थापून ब्रेड क्रम्स, जाड रवा किंवा शेवईचा चुरा यांपैकी एकातच वडे घोळून तव्यावर परतावेत. तसेच टरबुजाच्या किसात फक्त गूळ आणि मावेल तेवढी कणीक कालवूनही हा पदार्थ करता येतो.
हे मिश्रण थोडे पातळ करून त्याची धिरडीही करता येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply