दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात.
हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात.
त्यातीलच एक सगळ्याचाच आवडता पदार्थ म्हणजे उत्तपा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही वेगळ्या उत्तप्याच्या कृती
लसणीचा उत्तपा
साहित्य:- २५० ग्रॅम तांदूळ, दोन मुळे, लसून, कोथिंबीर, हिरवी मिरची याचे वाटण, पाव वाटी बारीक कापलेली लसूण, चवीनुसार मीठ.
कृती:- तांदूळ ४ ते ५तास भिजवावे, मुळा स्वच्छ धुऊन किसावे, तांदूळ मिक्सररमधून वाटून घ्या, मुळा, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीर वाटून (मिक्स रमधून) तांदळाच्या पिठात मिसळावे, हे पीठ धिरड्याच्या पिठाप्रमाणे असावे, जरूर वाटल्यास पाणी घालू शकता, आता त्यात चवीनुसार मीठ घालून पॅनमध्ये १ चमचा तेल घालून उत्तप्पे घालावे, दोन्ही अंगांनी गुलाबी भाजावे, दह्याबरोबर सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
दुध्याचा उत्तप्पा
साहित्य:- एक वाटी उडीद डाळ, एक वाटी मूग डाळ ३ ते ४ तास भिजवा, नाचणीचे पीठ अर्धी वाटी, दुध्याचा कीस १ वाटी, गाजराचा कीस अर्धी वाटी, पालक बारीक चिरलेला, लाल तिखट, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, आलं, लसूण.
कृती:- दोन्ही डाळी वेगवेगळ्या वाटाव्यात आणि बाउलमध्ये एकत्र कराव्यात त्यात दुध्याचा कीस, गाजराचा कीस, पालक व नाचणीचे पीठ घालावे, त्यात आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालावी, लाल तिखटही १ चमचा घालावे, चवीनुसार मीठ घालावे, पॅनमध्ये १ चमचा तेल घालावे, वरील पीठ घालावे, दोन्ही अंगानी लाल होऊ द्यावे, हे गरम गरम उत्तप्पे लोणी टोमॅटो सॉस बरोबर छान लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
नारळ-खवा उत्तप्पा
साहित्य- १वाटी रवा, १ वाटी नारळाचा चव (ओल्या नारळाचा), २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाव वाटी, चवीपुरते मीठ व साखर.
कृती :- बाउलमध्ये रवा, नारळाचा चव, हिरव्या मिरच्या, बारीक कापून कोंथिबीर मीठ व थोडीशी साखर घालून पीठ पाण्यात भिजवावे, धीरड्याप्रमाणे १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे, आता कांदा १ बारीक चिरून घालावा, पॅनमध्ये १ चमचा तेल घालावे, पीठ घालावे, दोन्ही बाजूनी लालसर होईस्तोर भाजावे, खजुराच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बाजरी मूग उत्तप्पा
साहित्य :- दोन वाटी बाजरी, १ वाटी मूग डाळ, १ वाटी उडीद डाळ हे ७ ते ८ तास भिजवा व वाटा, ओली चटणी १ वाटी, ओला नारळ पाव वाटी, भाजलेली चणा डाळ, फोडणी तेल मोहरी कापलेला कढीपत्ता, १ टेबल स्पून उडीद डाळ, हिरवी मिरचीचे तुकडे त्यात काजू १ टेबल स्पून हिंग – हळद घालावे. ही फोडणी चटणीवर व उत्तप्याच्या पीठावर ओता. चवीनुसार पीठात मीठ घालावे.
कृती:- पॅनमध्ये १ चमचा तेल घालून उत्तप्पा घालावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावं. चटणीबरोबर सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चीज दही उत्तप्पा
साहित्य:- एक वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा, 2 ब्रेडचे स्लाइस कडा काढून टाका, अर्धी वार्टी दही, मीठ, एक टोमॅटो, एक कांदा, 1 सिमला मिरची, तेल चीज.
कृती:- बाउलमध्ये रवा, मैदा, दही ब्रेडचे तुकडे करून घालावे. आवश्यटकतेनुसार पाणी घालून मिक्स्रमधून फिरवावा. पीठ बाउलमध्ये काडावे. चवीनुसार मीठ घालावे. किंचित सोडा घालावा. कांदा – सिमला मिरची – टोमॅटोचे तुकडे करावे. आता पॅनमध्ये 1 चमचा तेल घालावे. उत्तप्पा घालावा. त्यावर टोमॅटो – कांदा – सिमला मिरचीचे तुकडे घालावे. दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात. पुन्हा टोमॅटोच्या बाजूवर किसलेले चीज घालावे. झाकण ठेवावे. त्यात चीज मेलट झाले की उत्तप्पा सर्व्ह करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
खरवसाचा उत्तप्पा
साहित्य:- तीन वाटी कणीक, 2 वाटी खरवसाचे दूध, 1 टेबल स्पून आलं + लसूण + हिरवी मिरचीची पेस्ट + धने + जिरे पावडर एक चमचा तिखट – हळद – हिंग – दोन टेबल स्पून मैदा – चवीनुसार मीठ.
कृती:- वरील पीठे खरवसाच्या दुधात धीरड्याप्रमाणे भिजवावे. चवीनुसार मीठ घालावे. छान फेटून घ्यावे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून पीठ घालावे. दोन्ही अंगी छान भाजावे. दही – चटणीबरोबर सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply