साहित्य : एक वाटी साखर, पाव वाटी नारळाचा चव, आंब्याचा गोळा, १०-१५ काजू तुकडे, २ चमचे वेलची पूड, केशर, थोडा लिंबाचा रस (आवडीप्रमाणे)
कृती : प्रथम साखरेत पाणी घालून पाक होत आला की नारळाचा चव व आंबागोळी घालून उकळावे, कारण पाणी सुटते. पाक तयार झाला की खाली उतरून ठेवा. नंतर काजू, वेलची पूड, लिंबाचा रस घाला. शेवटी केशर घाला. गरम व गार दोन्ही छान लागते. पुरी, पोळी, ब्रेडबरोबर मुलांना आवडेल. फ्रिजमध्ये दोन आठवडे चांगले राहते.
टीप : आंबा रसाचा आटवून केलेला गोळा बाजारात तयार मिळतो.
Leave a Reply