ज्वारीला “जोंधळा’ असे ही म्हटले जाते. स्थूल व्यक्तीन, गाऊट (gout)चा आजार असलेल्या, वाढलेला होमोसिस्टीन (high homocystrine) , उच्च रक्तरदाब, वाढलेला कोलेस्टेरॉल, धमनीविकार या सर्वांसाठी ज्वारीची भाकरी व लाह्या उपकारक आहेत. मधुमेहींना देखील ज्वारीमुळे पुढे होणाऱ्या धमनीविकारांपासून (cardiovascular complications) संरक्षण लाभते. बैठी जीवनशैली असलेल्यांनी एका जेवणात तरी ज्वारीची भाकरी ठेवावी. गहू श्रमिकांसाठी चांगले तर ज्वारी बुद्धीचे काम करणाऱ्यांसाठी चांगली समजली जाते. भारतात ज्वारी सर्वत्र होते. लाल ज्वारी व पांढरी ज्वारी असे ज्वारीचे दोन प्रकार असतात. सोलापुरी व खान्देशी ज्वारी महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार ज्वारी थंड व पथ्यकारक असून ती मूळव्याधीवर गुणकारी आहे. ज्वारीची सवय नसल्यास पोटात गॅसेस होणे, शौचास अधिक वेळा लागणे अशा स्वरूपाचा त्रास होऊ शकतो. आहारात नियमित स्वरूपात भाकरी सुरू करताना तिचे प्रमाण अगदी हळूहळू वाढवून आपल्या प्रकृतीला रुचेल असे करावे. उन्हाळ्यात ज्वारी चांगली असते. ज्वारीपासून पेज बनवली जाते. ज्वारीच्या लाहय़ाही बनवल्या जातात. ज्वारीपासून कांजीही बनवली जाते. ज्वारीचे पापड, आंबील इत्यादी पदार्थसुद्धा बनविले जाते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
ज्वारीपासून बनविलेले काही पदार्थ
ज्वारीचे आंबील
ज्वार भाटा
आंबोला भात
Leave a Reply