व्हेजिटेरिअन लोकांसाठी डाळ हि एक वरदानच असते. त्यातलाच अख्खा मसूर हा एक डाळीचा प्रकार आपण पाहणार आहोत. मला नेहमीच जेवणामध्ये प्रयोग करायला आवडतात, पण जेंव्हा मी अख्खा मसूर रेस्टोरंट मध्ये खाल्ला आणि पहिल्यांदा घरी बनवला, तेव्हा ग्रेवी जमली नाही. मसूर पण खुप शिजले होते, म्हणून पुन्हा प्रयत्न केला. मसाल्यांची ग्रेवी बनवली परंतु त्यामध्ये मसाल्यांचीच चव जास्त लागली….म्हणून मग मी हा वेगळा प्रकार करुन पाहिला जेणेकरुंन मसूरला मसूरचिच चव लागावी आणि चव उत्कृष्ट असावी. आणि हा प्रयोग यशस्वी झाला, तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोहचावी अशी इच्छा.
तर आज मी तुम्हाला अशीच थोड़ी वेगळी, चवदार आणि दररोज पेक्षा वेगळा टच असलेली अख्खा मसूर दाखवणार आहे. थोड़ी इनोवेटिव, रेस्टोरंट स्टाइल आणि कोल्हापूरी पद्धतीने केलेली! तर मग आजच्या जेवणाचा मेनू अक्खा मसूर करुन घरच्यांना खुश करा.
साहित्य:
2 कप उकड़लेले मसूर ( याला रात्रभर भिजत ठेवा,नंतर त्यामधे कसूरी मेथी,मीठ आणि किसलेले आले टाकून 2 शिट्ट्या दया ), 1 कप मसूर पेस्ट ( ही बनवण्यासाठी शिजवलेल्या मसूर मधुनच आर्धा कप मसूरची ग्रेवी साठी पेस्ट बनवायचि आहे ), 1 कप बारीक़ कापलेला टोमॅटो, 1 कप बारीक़ चिरलेली कोथींबीर, 2-3 तेज पत्ते, 1 चमचा जीरा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिर्ची पावडर( काश्मिरी लाल मिर्च), 8-9 लसनाच्या पाकळ्या, 3 चमचे फ्रेश क्रीम, 1 कप बारीक़ चिरलेला कांदा,2 हिरव्या मिरच्या,आर्धा कप तेल, मीठ स्वादानुसार
कृती:
१) एका कढई मध्ये तेल गरम करत ठेवा, (ईथे गॅस मध्यम आचेवर ठेवा) तेल तपल्यावर जीरे व सोबत लसूण टाका.
२) लसूण सोनेरी होत आल्यावर त्यामधे तेज पत्ता आणि कांदा,हळद टाकून चांगले मिक्स करा. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यामधे टोमॅेटो टाका, चांगले मिक्स करा, कांदा अणि टोमॅटो मधून तेल सुटायला लागल्यावर त्यामध्ये धना पावडर, गरम मसाला पावडर आणि लाल तीखट टाकून चांगले मिक्स करा.
३) नंतर त्यामधे मसूर पेस्ट घाला, परतून घ्या अणि मग ग्रेवी साठी जितके पाणी हवे असेल तितके घालून ग्रेवी तयार करून घ्या, लक्षात ठेवा इथे आपल्याला मसूर शिजवतानाचेच पाणी वापरायचे आहे. ग्रेवी चांगली परतून शिजवून घ्यायची आहे. नंतर शिजवलेला मसूर घाला आणि मसूर व ग्रेवी चांगली परतून घ्या.
४) शिजतनाच हिरव्या मिरच्या आणि कोथींबीर टाका त्यामुळे खुप चांगली चव येते, आताउकळी आल्यावर गॅस कमी करा.
५) नंतर त्यात क्रीम टाका, चांगले मिक्स करा, चमच्याने ढ़वळत रहा जेणेकरुन क्रीम फुटणार नाही. आता झाकण ठेऊन 2 मिनट मंद आचेवर वाफ दया.
६) वाफ दिल्यावर सर्विंग बाऊल मध्ये काढून, वरुन कोथींबीर आणि क्रीम ने सजवून गरमा गरम चपाती,रोटी किंवा भातासोबत वाढा:)
Leave a Reply