आलू पराठा

साहित्य: २ वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, ३ मोठे उकडलेले बटाटे, ७-८ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या वाटून, १ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर, चवीनूसार पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप.

कृती: 
कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.
बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.
किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा.
भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत.
कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा.
जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*