साहित्य:- आंबा – १ मोठा (सुमारे ७०-८०% पिकलेला), पाणी – १ कप, ताक – ३ कप , चवीनुसार मीठ ,मेथीचे दाणे (मेथी) – १ १/२ टिस्पून ,जिरे – २ टिस्पून ,सुक्या लाल मिरच्या – २-३, किंवा चवीनुसार, भाजलेली चणा डाळ ३ टेस्पून ,बारीक खोबरे ३ टेस्पून ,हिरव्या मिरच्या १/३ कप पाणी.
फोडणीसाठी साठी : १ टेबलस्पून तेल, मोहोरी – १/२ टिस्पून, जिरे – १/२ टिस्पून, हिंग (हळद) – १/८ टिस्पून, सुक्या लाल मिरच्या २ ते ३, किंवा चवीनुसार, कढीपत्ता थोडा.
कृती: आंब्याचे तुकडे करून घ्या, एका पॅनमध्ये आंबा आणि १ कप पाणी घाला. एक उकळी आणा, आणि 5-8 मिनिटे आंबा शिजू द्या. दुसऱ्या पॅनमध्ये मेथी, जिरे आणि सुक्या लाल मिरच्या, डाळ भाजून घ्या. एका प्लेट हे सगळे काढून त्यांना पूर्णपणे थंड करण्यास ठेवा.
मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घ्या. नारळ, हिरव्या मिरच्या पाणी घालून पेस्ट करून घ्या. शिजवलेला आंबा काढा आणि ब्लेंडरमध्ये तो मॅश करा. मसाला पेस्ट घालून चांगले मिक्स करावे. ताक आणि मीठ, आंबा, पाणी घालून चांगले मिक्स करा. एक लहान कढई मध्ये तेल गरम करून मोहरीची, जिरे, हिंग, कढीपत्ता फोडणी करा. केलेल्या ताकात मसाला, पेस्ट घाला व फोडणी वरून घाला व एक उकळी द्या. भाताबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply