साहित्य : (सारणासाठी) दोन कप आंब्याचा घट्ट रस (२-३ मिनिट शिजवून घ्यावा.) १ कप खवा, अर्धा कप पिठीसाखर.
आवरणासाठी : दोन कप गव्हाचे पीठ, मीठ चवीपुरते.
कृती : गव्हाचे पीठ, मीठ व थोडे पाणी मिक्सर करून पीठ मळून घ्यावे. पिठाचे गोळे करून बाजूला ठेवावे. आंब्याचा रस, खवा व पिठीसाखर एकत्र करून मळून घ्या. एक-एक पिठाचा गोळा घेऊन थोडा पुरीसारखा लाटून त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण भरून गोळा बंद करून परत लाटून घ्यावा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पोळी दोन्ही बाजूने मंद विस्तवावर भाजून घ्यावी. गरम-गरम तुपाबरोबर सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply