साहित्य:- गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १, लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अॅलसिड, आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद ) १ टिस्पून बारीक केलेले अगर अगर, एक कप मिल्क पावडर, १ टिस्पून साखर, १ टिस्पून साजूक तूप.
कृती:- एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅलसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा. साखर या मिश्रणातच घालून शिजवा. एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागले कि त्यात अर्धा कप पाणी टाका. त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो. आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा. आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply