साहित्य:- ३-४ टेबलस्पून तेल, ५ कच्ची केळी. सोलून प्रत्येक केळ्याचे चार चार तुकडे करा. कढीपत्ता, अर्धा टीस्पून मोहरी, १ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, २ टेबलस्पून चिंचेचा कोळ, लसूण पाच पाकळ्या. तुकडे केलेला, अर्धा इंच आलं तुकडे केलेलं, १ टीस्पून तांदूळ.
कृती:- आलं, लसूण, तांदूळ यांची थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्या. ती बाजूला ठेवून द्या. मग झाकण ठेवून चिरलेली कच्ची केळी चांगली उकळून घ्या. बाजूला ठेवून द्या. गॅसवर एक भांडं तापत ठेवा. त्यात तेल घाला. मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्या. त्यात आलं, लसूण, तांदळाची पेस्ट घाला. इतर मसाले घाला. एक मिनीटभर परतवा आणि मग हळद घाला. चिंचेचा कोळ आणि दोन कप पाणी घाला. आता त्यात केळीचे काप घाला आणि रस दाट होईपर्यंत दोन मिनिटे शिजवा. गॅस बंद करा. कोथिंबीर घालून गरम गरम सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply