साहित्य:- सारणासाठी १२-१५ आठळ्या, (आठळ्या म्हणजे फणसाच्या गरातील बीया) ४-५ मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, १ कांदा, कोथिंबीर आवडीप्रमाणे, मीठ, लिंबू, साखर – चवीप्रमाणे.
फोडणीचं साहित्य:- पारी:- मैद्याच्या पारीसाठी लागणारे साहित्य :- १ वाटी मैदा, पाणी, चवीपुरते मीठ, मोहन २-३ चमचे (मोहन म्हणजे कडक तापवलेलं तेल)
कृती:- मैद्यात मीठ, मोहन आणि पाणी घालुन मैदा घट्टसर भिजवावा. १ वाटी मैद्याच्या १०-१२ पू-या होतात.
आठळ्या मीठाच्या पाण्यात उकडून, सोलून घ्याव्यात. त्यांचे बारीक तुकडे करून भरड वाटून घ्यावे. मिरची-आलं-लसूण वाटून घ्यावे. मैद्याची पारी करण्यासाठी पीठ भिजवून घ्यावे. फोडणी करून घ्यावी. त्यावर कांदा आणि आठळ्यांचं वाटण परतून घ्यावे. त्यावर पाण्याचा हबका मारून एक वाफ येवू द्यावी. ते चांगलं परतून घेवून त्यात मीठ, मिरची-आलं-लसूण वाटण आणि चवीप्रमाणे साखर घालावी. गार झाल्यावर त्यावर लिंबू पिळावे. कोथिंबीर घालून एकत्र करावे. मैद्याच्या पारीसाठी भिजवलेल्या पीठाची छोटी पूरी लाटावी. त्यावर आठळ्यांचं सारण पसरून करंजीचा आकार द्यावा. दोन्ही बाजूंनी घट्ट दाबून करंजी बंद करावी. ती कातून किंवा त्याची बाजू मुरडून घ्यावी. तेल तापवून मध्यम आचेवर करंजी तळावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply