साहित्य:- अर्धा किलो मोठाले टपोरे डोंगरी आवळे,अर्धा किलो साखर,५० ग्रॅम बदामाची पावडर, ५० ग्रॅम काजूचे बारीक तुकडे, अर्धा छोटा चमचा प्रत्येकी जायफळ व वेलची पावडर,चार टेबलस्पून साजूक तूप.
कृती:- सर्वात प्रथम आवळे नीट स्वच्छा धुवून व कोरडे करून घ्या व पाण्यात घालून उकडून घ्या. पाण्यातून काढून घ्या व थंड झाल्यावर त्यांचा गर काढून घ्या. मग गॅसवर एका पॅनमध्ये आवळ्याचा गर व साखर घालून ढवळत रहा. साखर विरघळून त्याचा दाट पाक झाला की त्यात साजूक तूप घालून आणखी पांच मिनिटे शिजवा. चांच्याने त्यातील थोडेसे मिश्रण काढून हातात घ्या व पुरेसे चिकट झाले की नाही ते बघा, झाले असेल तर गॅस बंद करा व मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर एखाद्या पातेल्यात काढून घ्या व त्यात वेलची पूड,जायफळाची पूड,बदामाची पावडर, काजूचे बारीक तुकडे घालून चांगले मिक्स करा. आता हाताला साजूक तूप लावून या मिश्रणाचे हवे तेव्हढे लहान आकारात लाडू वळा. एखाद्या हवाबंद डब्यात ठेवल्यास हे लाडू १५-२० दिवस छान टिकू शकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply