साहित्य :- 8-10 बेबी कॉर्न, एक कप मशरूम, एक चमचा जिरे, तमालपत्र, लवंगा, लाल मिरच्या, एका कांद्याचे चौकोनी तुकडे, एक चमचा टोमॅटो प्यूरी, एक चमचा आले-लसूण पेस्ट, दीड चमचा लाल मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, एक चौकोनी आकारात कापलेली सिमला मिरची, एक बारीक चिरलेले गाजर, 2-3 चमचे काजू-खसखस-मगज यांची पेस्ट, व्हेजिटेबल स्टॉक, चिमूटभर साखर, एक चमचा किचन किंग मसाला, मीठ चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे तेल.
कृती :- बेबी कॉर्न व मशरूम 2-3 मिनिटे गरम पाण्यात ठेवून निथळून घ्या. कढईत तेल गरम करून तमालपत्र, जिरे, लाल मिरची, लवंग, कांदा, आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पेस्ट, कोथिंबीर, किचन किंग मसाला, साखर व मीठ घालून परता. टोमॅटो प्युरी घालून 2-3 मिनिटे शिजवा. आता काजू-खसखस-मगज पेस्ट घाला. मग हळद, लाल तिखट, गरम मसाला, सिमला मिरची व गाजर घालून भाज्या शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवा. नंतर बेबी कॉर्न व मशरूम घालून 3-4 मिनिटे शिजवा. कोथिंबीरीने सजवून पराठे किंवा नानसह गरमागरम सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply