ग्रेव्हीसाठी साहित्य :- अर्धा कप पालकाची पेस्ट, एक कप दूध, अर्धा चमचा काजूची पेस्ट, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
भाजी बनवण्यासाठी साहित्य :- दोन कप बेबी कॉर्न, एक कप शिजवलेले मटारचे दाणे आणि फरसबी, एक कापलेली सिमला मिरची, एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा काळी मिरेपूड, लवंग पावडर, पाव कप मक्या:चे दाणे.
कृती :- पालकाची पाने शिजवून त्याची पेस्ट करा. कढईत तेल गरम करून त्यात पालकाची पेस्ट, दूध, मीठ आणि काजू पेस्ट घालून शिजवून घ्या. आता यात शिजवलेली भाजी, मक्यागचे दाणे, सिमला मिरची, हिरवी मिरची, बेबी कॉर्न, काळी मिरेपूड, लवंगपूड घालून व्यवस्थित परतून घट्ट होईपर्यंत शिजवा. गरमागरम पराठ्यासह सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply