साहित्य: २० बेबी कॉर्न, १/४ कप भोपळी मिरची, उभे पातळ काप, १/४ कप कांदा, उभे पातळ काप, ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १ हिरवी मिरची, बारीक चिरून, २ टीस्पून लसूण पेस्ट, १ टीस्पून आले पेस्ट, १ टीस्पून सॉय सॉस, १ टीस्पून व्हिनेगर, २ टीस्पून तेल + तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ, २ टेस्पून पाती कांद्याची पात, बारीक चिरून.
कृती: एक लहान वाडगे घ्यावे. त्यात २ टेस्पून कॉर्न फ्लोअर आणि थोडेसे पाणी घालावे. पातळसर पेस्ट करावी. थोडेसे मीठ घालून मिक्स करावे. बेबी कॉर्नचे १ इंचाचे तुकडे करावे. कॉर्न फ्लोअर पेस्टमध्ये हे तुकडे घालावे. तळणीसाठी तेल गरम करावे. त्यात बेबी कॉर्नचे तुकडे तळून घ्यावे. मध्यम पॅन घेउन त्यात २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालावी. कांदा आणि भोपळी मिरची घालून दोनेक मिनिटे परतावे. १/४ कप पाणी, सॉय सॉस आणि थोडे मीठ घालावे. एका लहान वाटीत २ टेस्पून पाणी आणि १ टेस्पून कॉर्न फ्लोअर घालुन पेस्ट बनवावी. हि पेस्ट हळूहळू पॅनमध्ये घालावी आणि मिक्स करावे, गुठळ्या होवू देउ नयेत. यामुळे सॉस थोडा घट्ट होईल. आता तळलेले बेबी कॉर्न घालून मिक्स करावे. व्हिनेगर घालावे. बेबी कॉर्न सॉसने व्यवस्थित कोट झाले पाहिजेत. बेबी कॉर्न मंचुरियन सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून पाती कांद्याने सजवावे आणि गरमच सर्व्ह करावे.
Leave a Reply