हा पराठा बाकर वडी सारखे सारण घालून बनवला आहे. खूप चविष्ट लागतो.
साहित्य : चिरलेली कोथिंबीर दीड कप, तीळ १ मोठा चमचा, बेसन २ मोठे चमचे, मिरची पावडर १/२ चमचा, पिठी साखर १ चमचा, आमचूर १/२ चमचा, आले लसूण पेस्ट १/२ चमचा, जिरं पावडर १/२ चमचा, हळद १/२ चमचा, तेल २ मोठे चमचे, मीठ चवीनुसार, भिजवलेली कणिक ८-९ पराठ्यांसाठी, कणिक पराठे बनवताना लावण्यासाठी, तेल भाजण्यासाठी.
कृती:
१. तीळ सुकेच भाजून घ्या. गार झाल्यावर जाडसर वाटून घ्या
२. एका कढईत १ चमचा तेल घालून बेसन लालसर रंगावर भाजून घ्या. एका ताटलीत गार करायला ठेवा
३. त्याच कढईत १ चमचा तेल चालून कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घाला व कोथिंबिरीचा रंग बदलेपर्यंत परतून घ्या. कोथिंबिरीचा रंग गडद हिरवा होईल. मिश्रण एका बाउल मध्ये काढा
४. त्यात बेसन, तिळाचे कूट, मिरची पावडर,साखर , आमचूर , हळद , जिरं पावडर आणि मीठ घाला व एकत्र करा.
५. पराठ्याचे सारण तयार आहे .
६. कणकेचा लिंबाएवढा गोळा घ्या. त्याची जरा मोठी पुरी लाटा
७. पुरीवर २-३ थेंब तेल पसरा. त्यावर एक चमचा सारण पसरा. थोडी कणिक भुरभुरवा . सारण हलक्या हाताने पुरीवर दाबून घ्या
८. ह्या पुरीचा एक रोल बनवा. रोल परत गोलाकार फिरवून गोल चक्र (spiral) बनवा
९. आता हे गोल चक्र जाडसर लाटून पराठा बनवा
१०. गरम तव्यावर तेल घालून पराठा भाजून घ्या
११. चविष्ट बाकर पराठा लोणी किंवा सॉस बरोबर खायला द्या
Leave a Reply