पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० – १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
आवरणासाठी लागणारे साहित्य: १ वाटी मैदा, ३/४ वाटी बेसन, हळद, मीठ चवीनुसार, १/४ छोटा चमचा हींग, १ मोठा चमचा तेल.
सारणासाठी लागणारे साहित्य: १/२ वाटी किसलेले सुखे खोबरे, १ मोठा चमचा खसखस, हळद, लाल मिरची पूड, १ मोठा चमचा पांढरे तीळ, १/२ छोटा चमचा धणे पूड, १/२ छोटा चमचा जिरे पूड, १/४ छोटा चमचा हींग, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, पीठी साखर १ छोटा चमचा, चिंचेचा कोळ.
आवरण बनविण्याची कृती: एका भांड्यात मैदा, बेसन, हळद, मीठ, हींग व तेल घालून एकजीव करून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडासे घट्ट पीठ मळुन घ्यावे. झाकण ठेवून १० मिनिटे बाजूला करून ठेवावे.
सारण बनविण्याची कृती: सर्व प्रथम एका भांड्यात किसलेले सुखे खोबरे, खसखस, हळद, पांढरे तीळ, लाल मिरची पूड, धणे पूड, जिरे पूड, मीठ व साखर घेवून चांगले एकजीव करून घ्यावे. मिक्सरला लावून थोडेसे जाडसर वाटून घ्यावे व या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावि.
या पुढील कृती: तयार पीठाचे समान भाग करून घ्यावे. पोळपाटावर थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यावी. तयार पोळीवर चिंचेचा कोळ चमच्याने पसरून घ्यावा त्यावर सरणाचे मिश्रण पसरावे आणि घट्ट रोल करावा. रोल घट्ट झाला नाही तर सारण बाहेर येते. सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे. तेल गरम करावे व तयार भाकरवडी गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत. बाकरवडी थंड झाली की हवाबंद डब्ब्यात ठेवाव्यात.
Leave a Reply