सुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री वर्कआऊट मिल आहे की एक केळे खाल्ल्याने पुढील दोन तासांपर्यंत तब्बल २०% ने आपली ऊर्जेची पातळी वाढलेली राहते.
छान अन्न खाऊ शकणाऱ्या बालकांसाठी हे पौष्टिक खाणे आहे. ज्या वृद्धांमध्ये कमी आहारामुळे शौचास साफ होत नाही अशांना केळे खाण्यास दिल्यास पोट साफ होण्यास मदत होते. शरीर सुकलेल्या व सडपातळ शरीरयष्टीच्या वृद्धांना तसेच एचआयव्ही पेशंटना साजूक तूप – केळे हे पौष्टिक अन्न ठरते. केळ्याचे वैशिष्ट्य असे, की कमी पिकलेले केळे हे मलावरोध दुरुस्त करते तर जास्त पिकलेले केळे (सालीवर काळे डाग हवे) हे जुलाबावर गुणकारी ठरते. वर्षभर सहज आणि सर्वत्र उपलब्ध असणारे केळे म्हणजे “ऑल टाईम फेव्हरिट डिश’. केळे नुसते खाता येते आणि त्याचे वेगवेगळे पदार्थही करता येतात. सर्वांना आवडणारे चिप्स आणि त्याचबरोबर फ्रेंच टोस्ट, सामोसे, हलवा, बाकरवडी इतकेच नव्हे तर केळ्याचे गुलाबजामही “टेस्टी’ लागतात. केळ्याची कोशिंबीर, केळ्याचे शिकरण नाहीतर फ्रुटसॅलेड यापेक्षा वेगळे पदार्थ बहुतेकांना माहीत नसतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही केळ्याचे पदार्थ
कच्च्या केळयांची भाजी
साहित्य:- ३ कच्ची केळी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ नारळ, ५-६ छोटे कांदे, १/२ चमचा जिरे, २ कडीलिंबाचे डहाळे, १ डाव तेल, चवीनुसार मीठ
कृती:- केळाची साले काढून प्रत्येक केळाचे १६ तुकडे करावेत व ते थोडया ताकात घालून स्वच्छ धुवावेत. मिरच्या वाटून घ्याव्यात. नंतर थोडी हळद व वाटलेली मिरची केळांना चोळून ठेवावी. थोडया पाण्यात मीठ घालून, त्यात केळांच्या फोडी टाकून मंदाग्नीवर त्या शिजवून घ्याव्यात. सर्व पाणी आटून केळाच्या फोडी कोरडया कराव्यात. १/२ नारळ व जिरे बारीक वाटून केळांवर घालावे. सतत हलवत रहावे. नंतर खाली उतरून ठेवावे. दुसर्याळ पातेल्यात तेल,हळद,मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगावर आला, की त्यात खोबरे खवून घालावे व जरा परतावे. त्यात शिजलेली केळी टाकून पुन्हा जरा परतावे व उतरवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळे फ्रेंच टोस्ट
साहित्य-:- १ केळे, अर्धा पेला दूध, पाऊण चमचा दालचिनीपूड, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, ब्रेडचे ५ स्लाईस, तेल.
कृती :- केळे कुस्करून त्यात दूध, दालचिनीपूड, इसेन्स मिसळा व फेटा. तवा गरम करा व हे मिश्रण ब्रेडच्या तुकड्यांना लावून फ्राय करा. एक बाजू फ्राय झाल्यावर दुसऱ्या बाजूवर मिश्रण लावून थोडे फ्राय करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळ्याची बाकरवडी
साहित्य:- ६ कच्ची केळी, २लहान चमचे आले-मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस,२ पेले मैदा,२ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तेल, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती :- केळी वाफवून घ्या. त्यानंतर ती सोलून कुस्करा. त्यात आले-मिरची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर घालून मळून घ्या व दोन भाग करा. मैद्यात मीठ व तेल मिसळून मळून घ्या. याचेही दोन भाग करा. एक भाग चपातीप्रमाणे लाटा व केळ्याचे मिश्रण त्यावर पसरून गुंडाळी करा व कडा बंद करा. आता या रोलचे तुकडे करा व गरम तेलात तळून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळ्याचे सामोसे
साहित्य:- २ कच्ची केळी, १ लहान चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, तेल. आवरणाचे साहित्य:- दीड पेला मैदा, 2 चमचे तेल, थोडे मीठ.
कृती:- एका पॅनमध्ये तेल गरम करून जिरे टाकून परता. मग हिरवी मिरची, हळद, आमचूर पावडर, मीठ व उकडलेली केळी टाकून पुन्हा परता. मैद्यात मीठ व तेल मिसळून मळून घ्या. त्याची पुरी लाटा व मधोमध दोन भाग करा. एका भागाला कोनाचा आकार देऊन त्यात सारण भरा. पाणी लावून कडा बंद करा. अशा प्रकारे सर्व सामोसे बनवून सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply