केळीचे शिकरण

साहित्य : दोन पिकलेली (सालीवर काळे ठिपके पडलेली) केळी, दोन वाटया भरून तापवून थंड केलेले दूध, चहाचे तीन चमचे भरुन साखर, वेलदोडयाची पूड असल्यास ती चिमूटभर.

कृती : एका पातेलीत दूध घेऊन त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत हलवावी. एका बशीत केळी सोलून ती हाताने खूप कुस्करावीत. कुस्करलेली केळी नंतर साखर घातलेल्या दूधात घालून नीट मिसळावीत व सर्वात शेवटी त्यात वेलदोडयाची पूड घालवून हलवावे. झाले शिकरण तयार.

टीप : हे शिकरण लगेच संपवायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवले तर काळे पडते. याबरोबर ३-४ पोळया सहज खाता येतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*