साहित्य : २ ते ४ मध्यम आकाराचे बांगडे स्वच्छ करून घ्या .तळण्याकरिता ३ ते ४ पळ्या गोडं तेल
म्यारीनेट करण्यासाठी मसाला : ४ ते ५ चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला , पाऊण चमचा हळद ,७ ते ८ लसणाच्या पाकळ्या ,१ इंच आल्याचा तुकडा ,आवडीनुसार १ टी. स्पून चिंचेचा कोळ ,३ ते ४ हिरव्या मिरच्या ,अर्धी खोबऱ्याची भाजलेली वाटी,चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या .
पूर्व तयारी : बांगडे स्वच्छ धुवून घ्या आणि मसाला भरण्याकरिता त्यांवर चाकूने चिरे मारून घ्या. आता तयार केलला म्यारीनेशन चा मसाला बांगड्यांना चांगल्या प्रकारे चोळून लावा आणि चिरा मारलेल्या जागी पण व्यवस्थित भरा . आणि मसाला लावलेल्या तुकड्या अर्धा ते पाऊण तास म्यारीनेशन साठी फ्रीज मध्ये ठेवून द्या .
कृती : तव्यामध्ये तेल गरम करून मंद आचेवर बांगडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या( शालो फ्राय ) .झक्कास पैकी गरमा गरम बांगडा फ्राय तय्यार .
Leave a Reply