साहित्य : एक किलो टोमॅटोच्या प्युरीकरिता टोमॅटो बारीक चिरून उकळून घ्यावा किंवा वाफवावा. यात वरून पाणी घालू नये. अंगच्याच पाण्याने शिजवावे. त्यामुळे प्युरी घट्ट होईल. मिक्सर मध्ये बारीक करून चाळणीतून गाळून घ्यावी. काजू, मगज पेस्ट २ वाटय़ा (काजू, मगज एक, एक, वाटी घेऊन उकळून घ्यावे व त्याची पेस्ट बनवावी). आलं, लसूण पेस्ट एक वाटी, धणे पावडर एक चमचा, जिरे पावडर एक चमचा, कसुरी मेथी एक चमचा, खडा मसाला पावडर एक चमचा, (घरी जेवढे खडे मसाले उपलब्ध असतील ते बारीक करून पावडर करावी , हळद पाव चमचा, मीठ, साखर व तिखट चवीप्रमाणे, रेड ऑरेंज रंग छोटा १/२ चमचा, व्हिनेगर २ चमचे, तेल अर्धी वाटी, तमालपत्र ३४.
कृती : पातेल्यात तेल घेऊन त्यात आलंलसूण पेस्ट टाकावी. थोडे पाणी घालून मिश्रण उकळल्यावर, पारदर्शक झाल्यावर टोमॅटो प्युरी, काजू, मगज पेस्ट घालून थोडेसे पाणी व तमालपत्र घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर सर्व मसाले, मीठ घालून पुन्हा उकळी येईस्तोवर किंवा तेल सुटेस्तोवर परतावे. थंड केल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply