साहित्य:- ४ लिटर दुध, १/४ कप बदाम, पिस्ते (मीठ नसलेले), २ टीस्पून चारोळी, ३/४ ते १ कप साखर, १ टीस्पून वेलची पूड.
कृती:- बदाम आणि पिस्ते ३ तास भिजत घालावेत. नंतर सोलून पातळसर काप करावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती कालथ्याने मोडावी. कालथा उकळत्या दुधात ठेवून द्यावा म्हणजे दुध उतू जात नाही. दुध तळाला चिकटून करपू नये म्हणून तळापासून कालथ्याने हलवा. दुध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा. दुध आटले कि त्यात बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी घालावी. तसेच साखर घाला. आधी १/२ कप साखर घाला, चव पाहून लागल्यास उरलेली साखर घाला. अजून १० मिनिटे उकळवा. आच बंद करून वेलची पूड घाला. बासुंदी गार होवू द्यात. नंतर फ्रीजमध्ये किमान ३ ते ४ तास ठेवा. थंड झाली कि बासुंदी दाट होईल. फ्रीजमध्ये ठेवल्यावर बासुंदीवर जाड साय चढलेली दिसेल. ती डावेने मोडा आणि मिक्स करा. नंतरच सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply