साहित्य:- ८-१० बटाटे, आलं, लसूण, मिरची, गरम मसाला, ब्रेडचा कुस्करा, रवा, पॅटिस साचा, कोथिंबीर, साँस इ.
कृती:- बटाटे उकडून घ्या. ते कुस्करून घ्या, ताजा कुटलेला गरम मसाला, चवीप्रमाणे आलं, लसूण, मिरची यांचे एकजीव मिश्रण करा. हे मिश्रण कुस्करलेल्या बटाटयांत चांगले मिसळा. एक चवदार व एकजीव मिश्रण तयार होईल याची काळजी घ्या. वेगवेगळया आकाराचे पॅटिसचे साचे बाजारात मिळतात. शंकरपाळी, बदाम यासारखा आकार या मिश्रणाला द्या. पॅटिसचा साचा नसेल तर घरी देखील आपण निरनिराळे आकार देऊ शकतो. मिश्रणाला आकार दिल्यावर सुक्या पावाचा कुस्करा करा. त्यात थोडा रवा देखील मिसळला तरी चालेल किंवा आवडीप्रमाणे रव्याचाच लेप कच्च्या पॅटिसला बाहेरून द्या. या मिश्रणामध्ये पॅटिस चांगले सर्व बाजूंनी घोळवा. एवढे झाल्यावर फ्राय पॅन किंवा तव्यावर थोडेसे तेल घाला. तव्याला आच द्या. एकाचवेळी थोडयाशा तेलावर पाच ते सहा पॅटिस भाजून काढा. कुरकुरीत गरमागरम पॅटिस खावयास देताना, साँस किंवा कोथिंबीर चटणी सोबत द्यावेत. जास्त चवदार लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply