साहित्य : दोन वाटय़ा डाळीचे पीठ, अर्धा वाटी साजूक तूप, दोन टीस्पून दूध, दोन वाटय़ा पिठीसाखर, एक टीस्पून वेलदोडा.
कृती : तूप पातळ करून डाळीच्या पिठाला एकसारखे चोळून पीठ १०० टक्के पॉवरवर अडीच मिनिटे भाजा आणि हलवा. परत एक मिनिट १०० टक्के पॉवरवर हलवा. त्यात दूध घालून १०० टक्के पॉवरवर दोन मिनिटे ठेवा; परंतु एक मिनिटाने दार उघडून हलवा. ब्राऊन रंग येईपर्यंत १०० टक्के पॉवर एक मिनिट भाजा. गार झाल्यावर पिठीसाखर व वेलदोडे पूड घालून मिसळा आणि लाडू वळा. पाहिजे असल्यास थोडे तूप पण मिसळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply