साहित्य:- चार कोवळी कारली, एक कांदा, एक टोमॅटो, चमचाभर धने-जिरेपूड, दोन-तीन लाल मिरच्या, चिमूटभर हळद, अर्धा चमचा गरम मसाला, दोन चमचे पंढरपुरी डाळे, दोन चमचे डाळिंबाचे दाणे, दोन चमचे तेल, मीठ.
कृती:- टोमॅटो गरम पाण्यात घालून साले काढून रस करावा. कारली वरून खरवडावी. मग उभी चीर देऊन बिया काढून टाकाव्यात व कारली मीठ लावून अर्धा तास ठेवावीत. मिरच्या, डाळे, डाळिंबाचे दाणे मिक्सढरवर फिरवून पूड करावी. चमचाभर तेल तापवून, त्यात कांदा परतावा. गुलाबीसर झाल्यावर त्यात वाटलेला मसाला, हळद, गरम मसाला, धने-जिरे पूड व मीठ घालून हलवावे. नंतर त्यात टोमॅटोचा रस घालावा. शिजवून, कोरडे झाल्यावर खाली घ्यावे. गार झाल्यावर ते धुतलेल्या कारल्यात भरावे व दोऱ्याने बांधावे. मग थोड्या तेलात कारली लालसर होईपर्यंत परतावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply