साहित्य:-आइसबर्ग लेट्यूसचे मोठे चौकोनी काप २ वाट्या, १ मोठी काकडी साल काढून मोठे तुकडे करून, १/२ कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक फोडी करून, आणखीन कुठल्याही प्रकारची सलादची पाने स्वच्छ धुऊन व मोठे तुकडे करून, १/४ लाल व पिवळी भोपळी मिर्ची बारीक चिरून,
कृती:- सर्व एकत्र मिसळावे. १/२ वाटी कुठल्याही प्रकारचे फरसाण/चिवडा/भेळ:-मिक्स घालावे. २ टेबलस्पून चिंचगुळाची गोड चटणी घालावी. १/२ टीस्पून चाट मसाला घालावा व सर्व चांगले मिसळावे. वरून थोडी बारीक शेव व बारीक चिरून कोथिंबीर घालावी. सलादची पाने व फरसाण कुरकुरीत असतानाच लगेच खायला द्यावे. वाढायला थोडा वेळ असल्यास, ओली चटणी व फरसाण मात्र ऐन वेळेस घालावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply